गहू आणि तांदळाच्या प्रमाणात सरकारने केला बदल; लाभार्थ्यांच्या तक्रारींनंतर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय.
नव्याने निश्चित केलेले धान्याचे प्रमाण
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत राज्यातील रेशन कार्ड धारकांना दिल्या जाणाऱ्या धान्य वितरणात जानेवारी २०२६ पासून बदल करण्यात येणार आहे. सध्या डिसेंबर २०२५ चे वितरण जुन्याच पद्धतीने सुरू असून, नवीन वर्षापासून अंतोदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना या दोन्ही श्रेणीतील लाभार्थ्यांसाठी गहू आणि तांदळाचे प्रमाण पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहे. तांदळाचे प्रमाण जास्त आणि गव्हाचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना अडचणी येत होत्या, ज्याची दखल आता सरकारने घेतली आहे.
अंतोदय अन्न योजना (AAY) लाभार्थ्यांसाठी नवीन नियम
अंतोदय शिधापत्रिका धारकांना (पिवळे रेशन कार्ड) आता प्रति शिधापत्रिका ३५ किलो धान्य मिळते. जानेवारी २०२६ पासून या ३५ किलोमध्ये २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू अशा प्रमाणात धान्य दिले जाणार आहे. यापूर्वी हे प्रमाण २५ किलो तांदूळ आणि १० किलो गहू असे होते. गव्हाचे प्रमाण वाढवल्यामुळे गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, आहारातील संतुलन राखण्यास मदत होईल.




















